Take a fresh look at your lifestyle.

लग्नाविषयी नेहा कक्करचा मोठा खुलासा म्हणाली,खरं लग्न…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । नेहा कक्कर आणि आदित्य नारायणच्या लग्नाच्या बातमीने ‘इंडियन आयडल सीझन ११’ च्या टीआरपीमध्ये मोठी वाढ झाली. शो दरम्यान या दोघांनी लग्नाची रीतीरिवाज देखील केले होते.मात्र, नंतर दोघांचेही लग्न झाले नाही. दरम्यान, नेहा कक्कर यांनी एका मुलाखती दरम्यान आदित्य नारायण बरोबरच्या लग्नाबद्दल बरेच काही सांगितले आहे.

नेहा कक्कर यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर बोलताना सांगितले- ‘आदित्य खूप चांगला माणूस आहे. त्याचे मन खूप सुंदर आहे. मला हे सांगण्यात आनंद होतो आहे की यावर्षी माझ्या प्रिय मित्राच त्याच्या मैत्रिणीशी लग्न होते आहे. मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि त्यांनी नेहमी एकत्र रहावे अशी मी प्रार्थना करते.

वरमाला घालतानाचा व्हिडिओ येताच नेहा आणि आदित्यच्या लग्नाची बातमी अधिक जोरदार पसरली. हा व्हिडिओ इंडियन आयडॉलच्या सेटवरचा होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य नारायण यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदित्यने एका खास मुलाखतीत म्हटले होते-‘लग्न हा माझ्यासाठी एक मोठा निर्णय आहे. मी माझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतल्यास मी तो स्वत: जाहीर करेन.मी ते लपवणार नाही. सत्य हे आहे की हे सर्व एक विनोद म्हणून सुरू झाले ज्याला लोकांनी खूपच गंभीरपणे घेतले.

‘सोशल मीडियावर काही दिवसांपासून आमच्या लग्नाविषयी बरेच काही सुरू आहे, जे चुकीचे आहे.मीडियामधील कोणतीही व्यक्ती आमच्याकडे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आली नाही. हे सर्व फक्त एका रिआलिटी शोच्या टीआरपीसाठी केले गेले. शोच्या निर्मात्यांनी आम्हाला करण्यास सांगितले म्हणून आम्ही ते केले, परंतु सर्वकाही एक विनोद म्हणून होते.आदित्यच्या या वक्तव्यानंतर नेहा आणि आदित्य यांचे गाणे प्रसिद्ध झाले. या गाण्याचे नाव गोवा बीच आहे. हे गाणे नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने दिग्दर्शित केले आहे. अलीकडेच नेहा आणि आदित्यच्या लग्नाबद्दल उदित नारायण यांनी केलेले विधानही समोर आले आहे. हे सर्व केवळ ‘इंडियन आयडल ११’ ची टीआरपी वाढवण्यासाठी केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारण नेहा या शोची जज आहे तर आदित्य अँकर आहे. ‘