Take a fresh look at your lifestyle.

लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर करून केली पोलखोल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या सोबत लीलावती रुग्णालयता घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे.तसेच ती लीलावती रुग्णालयावर भडकली असल्याचे दिसत आहे.

झरीनच्या आजोबांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना उपचरासाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये एक कोविड वॉर्ड आहे. तेथे प्रत्येक रुग्णाचे तापमान चेक केले जाते आणि माझ्या आजोबांचे एकद नॉर्मल तापमान होते. कारण लॉकडाउननंतर तिचे आजोबा त्या दिवशी पहिल्यांदा बाहेर पडले होते. तरी देखील त्यांची करोना चाचणी करण्यास सांगितली.

झरीन खान म्हणते की मी आता पर्यंत फक्त ऐकले होते की काही झालं तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाऊ नका. त्यांनी सध्या बिझनेस खोलला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे आजोबांना उपचाराची गरज होती. तरी त्यांना कळाले नाही. ज्यांना आपण कोविड वॉरिअर म्हणतो जेव्हा त्यांची आपल्याला गरज असते तेव्हा ते असे वागतात’ असे तिने म्हटले आहे. झरीनच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’