Take a fresh look at your lifestyle.

लैगिंक अत्याचार प्रकरणी अनुराग कश्यपला अटक करा ; कंगनाची मागणी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला असून ट्विटवर ही माहिती दिली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषने नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षाही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केली आहे.

अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायल घोषच्या समर्थनार्थ ट्विट करून अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे.केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही सुशांत प्रकरणावरुन कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळाला होता.

पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात केस दाखल केलेली नाही. परंतु राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’