Take a fresh look at your lifestyle.

भेदभाव झुगारून माणुसकीला वाव देणारी राणूआक्का; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातून लोकांच्या मनामनात अगदी अल्पावधीतच एक मानाचे आणि प्रेमाचे स्थान मिळवणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेचा मोठा चाहता वर्ग आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते’मध्ये अनघा पात्र साकारून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मात्र स्वराज्य रक्षम संभाजी मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारलेली राणू अक्का आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षातआहे. लोकांनी त्या मालिकेसह मालिकेतील प्रत्येक पात्रावर अत्यंत प्रेम केले आहे. सध्या अश्विनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने आपला एक अनुभव शेअर करत काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अश्विनीने इंस्टावर दोन फोटो आणि एक संभाषण शेअर केले आहे. यात तिने लिहिले की, स्थळ – खेड- शिवापूर टोल नाका, समोरून – ही सेम राणूआक्कांसारखी दिसतेय न. सज्जू – आहो त्याच आहेत. आणि मग फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. आडनावांवरून जात समजावी एवढी मोठी अजून झाले नाही. पण चेहऱ्यावरून स्वभाव समजेल एवढी नक्कीच झालेय. जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी हे नानांनी शिकवले. आणि तसेही आमचे नाते कलाकार आणि रसिक माय-बाप हे आहेच की. या फोटोत अश्विनीला खेड- शिवापूर टोल नाका येथे काही तृतीयपंथीयांनी ओळखले आणि मग अश्विनीनेसुद्धा त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. तिला आलेला हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अश्विनीच्या या पोस्टला सध्या सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. इतकेच नव्हे तर तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षावसुद्धा होतो आहे. अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे, तर ती आई कुठे काय करते मालिकेत काम करतेय. शिवाय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत राणू आक्काची भूमिका तिने अव्वल साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते आणि अगदी आजही होत आहे. तसेच तिने अस्मिता मालिकेतही सहाय्यक भूमिका साकारली होती. शिवाय टपाल आणि बॉईज या चित्रपटातही अश्विनी झळकली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण या व्यतिरिकीय ती एक समाज सेविका असून समाजाप्रती आपली भूमिका पार पडताना नेहमीच सक्रिय दिसते.