Take a fresh look at your lifestyle.

‘चल, काही काय? 40?’; हेमांगीच्या सेल्फ बर्थडे पोस्टनंतर थँक यू पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी लहान ते मोठी अशी प्रत्येक गोष्ट ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. इतकेच नव्हे तर आपल्या चाहत्यांसह ती बोल्ड फोटोग्राफ्स आणि बोल्ड विचार सुद्धा शेअर करते. तिच्या विचारांचा काही लोक मनापासून आदर करतात तर उरलेले बाकी तिला ट्रोल करताना दिसतात. पण बिनधास्त बेधडक हेमांगी आपल्या भावना दिलखुलासपणे व्यक्त करते. त्यामुळे तिच्या नवनवीन सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. अगदी कालचीच पोस्ट पहा ना. आपल्या स्वतःच्याच वाढदिवसाची तिने एक भन्नाट पोस्ट शेअर केली होती आणि यात तिने आपले नेमके वय किती हे स्पष्टपणे सांगितले होते. चाळीशी झाली असे सांगणाऱ्या हेमांगीच्या चाहत्यांनी मात्र चल कायतरीच काय असे म्हणत तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यानंतर आता तिची थँक यु पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

आता नुकतंच २६ ऑगस्ट ला हेमांगीचा वाढदिवस पार पडला आणि तिने ४० चा टप्पा पार करीत ४१ व्या वयात पदार्पण केले. मुख्य म्हणजे तिने एक भन्नाट पोस्ट लिहून स्वतःच हे सांगितले. भले गुगलवरील चुकीच्या जन्मवर्षाच्या नोंदीमुळे ती ३३ वर्षाची वाटत असेल पण खरं हेच आहे कि हेमांगीने चाळीशी पार केली आहे. या पोस्टवर हेमांगीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर तिने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिले कि, ‘तुमच्या शुभेच्छांसोबत, ‘चल, काही काय? 40?’ ‘कुठल्या angel ने 40?’ ‘आईय्या अजूनही किती लहान दिसत्येस’ ’21 वर्षांची असशील’ ‘एज इज जस्ट अ नंबर’ अरे यार, 40? हिचं काय करायचं? ’14 चं 41 चुकून लिहिलं असशील.. बरोबर कर’ वगैरे वगैरे…

पुढे, हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल, कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव! ही ही ही… जोक अपार्ट पण काल तुमच्या सोशल मीडियावर आलेल्या गोड गोड कमेंट्स, टेक्स्ट, डीएम्स, फोन कॉल्समुळे, माझ्यावर लिहिलेल्या राईट अप्समुळे माझा वाढदिवस झकास झाला त्यासाठी प्रत्येकाला थँक यू थँक यू सो मच! ऐसे ही प्यार और आशीर्वाद बना रहे दोस्तों! त. टी. : वाढदिवस काल म्हणजे 26 ऑगस्टला होता याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी, आज या ठिकाणी 27 ऑगस्ट आहे लोक हो!

Leave A Reply

Your email address will not be published.