Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा शेट्टी राज कुंद्रापासून विभक्त होणार?; मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घेण्यास तयार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड जगतात गाजत असलेले सर्वात मोठे प्रकरण म्हणजे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे पॉर्नोग्राफी प्रकरण. या प्रकरणी राज कुंद्राला अटक झालीच पण यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला नाहक मनस्ताप झाला असून आर्थिक तोटा व ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यात आता तिच्या एकटीवर आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी आली आहे. त्यामुळे शिल्पनाले मासिक रित्या भक्कम होऊन आता आपलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात मुलांच्या भविष्यासाठी शिल्पा आपल्या पतीपासून अर्थात राज कुंद्रापासून विभक्त होणार असल्याची बातमी समोर येत आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शिल्पा आपल्या दोन्ही मुलांसह पतीपासून वेगळं होण्याचा विचार करीत आहे. शिल्पाच्या एका मित्राने सांगितले की, राज कुंद्राचे इतके पैसे अशा मार्गाने यायचे हे शिल्पालादेखील माहित नव्हते. तिलाही धक्का बसला होता. आता आपल्या नवऱ्याने अशा चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशांपासून तिला आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे. त्यामुळे तिला राजचे पैसे वापरायचे नाहीत. ती रिअॅलिट शो आणि फिल्ममध्ये काम करून त्यातून पैसे कमवून आपल्या मुलांचं पालनपोषण करेल. याबाबत अद्याप शिल्पाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु सर्वत्र या बातमीने जोर धरला आहे.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा सुपर डान्सर ४ मधूनही ब्रेक घेऊन लांब गेली होती. पण यानंतर नुकतेच तिने शोमध्ये पुनरागमन केले आहे. शिवाय आता सोशल मीडियावरदेखील ती अ‍ॅक्टिव्ह दिसते आहे. शिल्पा शेट्टीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करताना म्हणाली, ज्यानुसार कोणताही क्षण वाया न घालवता. आपलं आयुष्य जगावं कारण आयुष्यात पॉज बटण नसतं.

बऱ्याचवेळा वेळ चांगली किंवा वाईट असलीतरी आयुष्यातला तणावपूर्ण क्षण आले असती तर, ते आपल्या आयुष्यातून काढू शकतो का? परिस्थिती कशीही असो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण झरझर निघून जात असतो. आपल्याकडे फक्त वेळ असतो आणि प्रत्येक क्षण आपण चांगल्या पद्धतीने जगाला हवा. जोपर्यंत शिल्पा याबाबत अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत या बातमीची खातरजमा होणे शक्य नसले तरीही लवकरच शिल्पा इज बॅक म्हणता येईल इतके नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.