Take a fresh look at your lifestyle.

ते रिलेशनमध्ये आहेत का..? व्हायरल व्हिडिओनंतर शेहनाज- सलमानच्या लव्ह कनेक्शनची चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनच्या पार्श्ववभूमीवर गेल्या २ वर्षात कोणताही सण साजरा करण्यात आला नाही. दरम्यान या वर्षांमध्ये सलमान खानच्या घरी जंगी ईद साजरी केली गेली नाही. मात्र आता नियमांचे बंधन नसल्यामुळे यंदाची ईद भाईजानने जोरदार साजरी केली. यावेळी त्याने ईद पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकांना आमंत्रित केले होते. यामध्ये जॅकलिन फेर्नांडीज, सुश्मिता सेन, कंगना रनौत, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, करिष्मा कपूर आणि अजून अनेक दिग्गज मंडळी होती. यामध्ये बिग बॉस फेम शेहनाज गिलचा देखील समावेश होता. या ईद पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे शेहनाज आणि सलमानचा. ज्यामध्ये शेहनाज सलमानला मिठी मारते आणि मानेवर किससुद्धा करते. त्यामुळे एक वेगळीच चर्चा जोर धरताना दिसतेय.

या व्हिडिओमध्ये जे दृश्य दिसत आहे त्यावरून नेटकऱ्यांनी विविध तर्क लावले आहेत. आपण सारेच जाणतो कि, सलमान शहनाजचा उल्लेख “पंजाब की कतरिना कैफ” असा करतो. तर या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय कि, सलमान खान शहनाज गिलसोबत कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोज देतो. दरम्यान तो तिला सी ऑफ करायला आल्याचे दिसत आहे. यावेळी शेहनाज सलमानला मिठी मारते आणि त्याच्या गळ्यावर किस करते. इतकेच नव्हे तर सलमान तिला, “जाओ पंजाब की कतरिना कैफ (जा पंजाब ची कॅटरिना कैफ) ,” असे म्हणतो. तर शहनाज गिल त्याचे हात तिच्या हातात घेते आणि त्याला तिच्या मागे ओढते. सोबत ती बोलताना दिसतेय कि, “छोडके आओ मुझे (सोडून ये मला).” दरम्यान ती चुकीच्या कारकडे जाताना सलमान तिला तिच्या कारकडे घेऊन जातो आणि तिच्या कारमध्ये बसवतो.

या व्हायरल व्हिडिओने एकंदरच सोशल मीडिया युजर्सची बत्ती गुल्ल केली आहे. दरम्यान दोघांच्याही चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत . अनेकांनी तर यांचे लव्ह कनेक्शन आहे का काय असे अंदाज वर्तवले आहेत. तर अनेकांनी शेहनाजला ट्रोल केले आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाज एकटी पडली होती. सिद्धार्थ आणि तिचे नाते अतिशय वेगळे होते. ते लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याचे निधन झाले आणि सगळं काही एका क्षणात थांबलं. यानंतर आता सलमानसोबत शेहनाजचं असं वागणं अनेकांना पटलेलं नाही. तिला ट्रोल करणाऱ्यांमध्ये सिद्धार्थच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले कि, “आज तो जलने वाले की रूह भी जल गई,”. तर आणखी एकाने लिहिले कि, “माफ करा पण हे सामान्य दिसत नाही, मला वाटते की दोघेही मद्यधुंद आहेत किंवा जास्त प्यायले आहेत, मी शहनाजला असे कधी पाहिले नाही” तर आणखी एकाने लिहिले कि, हे काय आहे.. ती नशेत आहे का?” आणखी एकाने लिहिले कि, “दारू तेव्हढीच प्या जेव्हढी झेपेल. आणखी एकाने लिहिले कि, सिद्धार्थला विसरलीस का..? तर अन्य एक म्हणतो, उगीच सलमानच्या गळ्यात पडतेय. आणखी एकाने लिहिलंय कि, स्टुपिड दुसरं कुणी मिळालं नाही का..? अशाप्रकारे शेहनाज चांगलीच ट्रोल होताना दिसतेय.