Take a fresh look at your lifestyle.

माधुरी दीक्षित – अक्षय कुमारचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेत्री माधुरी दीक्षित आजकाल सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव असते. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षितचे थ्रोबॅक व्हिडिओही जोरदार वायरल होत आहेत. नुकतंच माधुरी दीक्षितचा एक डान्स व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.या व्हिडिओमध्ये ती अक्षय कुमारसोबत रोमँटिक डान्स करत आहे. माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओ वर बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

रोहन तनुच्या यूट्यूब वाहिनीवर माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार यांचे डान्स व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत. आतापर्यंत 26 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. माधुरी दीक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच म्हणलं तर अभिनेत्री गेल्या वर्षी कलंक आणि टोटल धमाल मध्ये दिसली होती. माधुरी दीक्षित रियलिटी टीव्ही शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. ‘डान्स दिवाना’ या रिअॅलिटी शोच्या नवीन सीझनमध्ये ती दिसणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’