Take a fresh look at your lifestyle.

अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ ची सलमान च्या ‘राधे’ ला टक्कर म्हणाला,-“हे असं पहिल्यांदाच थोडी होतंय…”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या ईदला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ‘दबंग’ सलमान खान एकमेकांना भिडताना दिसणार आहे.दोघ्यांच्याही चित्रपट अनुक्रमे ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘राधे’ ईद च्या दिवशी रिलीज होणार आहेत. जिथे अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे मात्र एकीकडे सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचे शूटिंग अजूनही सुरू आहे.या दोन चित्रपटांच्या रिलीजिंगच्या तारखेबाबत बरीच ‘कॉन्ट्रोवर्सी’होत आहे. मात्र, आता अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदाच यावर उघडपणे व्यक्त केले आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने सलमान खानशी चित्रपटाच्या होणाऱ्या संघर्षा विषयी सांगितले की त्याच्या चित्रपटाने दुसर्‍या चित्रपटाशी टक्कर घेण्याची ही पहिली वेळ नाही. हा अभिनेता म्हणाला, “मला माहित आहे. पण माझ्या कारकिर्दीतील हा पहिला चित्रपट नाही जो दुसर्‍या चित्रपटाशी टक्कर घेत आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आहे कि हे शेवटचही असंणार नाही.”

अक्षय कुमार पुढे म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीत दरवर्षी बरेच चित्रपट प्रदर्शित होतात ज्यासाठी शुक्रवार कमी असतात. अशा वेळी चित्रपट एका दिवसात काही ना काही बरोबर प्रदर्शित होतील. हे अगदी स्वाभाविक आहे कारण हे दोन मोठे चित्रपट आहेत, म्हणून त्यांच्याविषयी अधिक चर्चा होईल कारण त्यात अधिक पैसे गुंतवले आहेत. “