Take a fresh look at your lifestyle.

आलिया भट्टची ‘ही’ पोस्ट कंगना रनौतला उत्तर तर नाही ना?

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडमधील नेपोटीझम बाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. यानंतर करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींवर आरोप करण्यात आले. यावर आलिया भट्ट यांनी फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. आता तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टने रविवारी तिच्या अकाउंट वरून एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. यावर त्यांनी लिहिले की, ‘सत्य हे सत्य आहे, भलेही कोणाचा विश्वास नसेल. आणि खोटं हे खोटं असत ,जरी सर्वानी त्याच्यावर विश्वास ठेवला तरी. आलिया भट्ट यांचे हे पोस्ट कंगना राणौत यांनी घेतलेल्या मुलाखती नंतर आले आहे ज्यात तिने महेश भट्ट, करण जोहर आणि आदित्य चोप्रावर खळबळजनक आरोप केले आहेत.

aaliya

कंगना रनौतने अनेक खुलासे केले

अलीकडेच एका मुलाखतीत कंगना रनौतने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणाली होती की सुशांतसिंग राजपूत यांचे मनोधैर्य तोडून कारकीर्द खराब करण्याचा कट रचला गेला.

Comments are closed.