Take a fresh look at your lifestyle.

रियाच्या भावाला अटक होताच अंकिताने शेअर केले ‘हे’ जबरदस्त ट्विट ; म्हणाली की….

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली.शोविक आणि मिरांडा यांनी सुशांतला नशेची सवय लावून अंमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत.त्यामुळे सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

याच दरम्यान NCBने केलेल्या या कारवाईवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने प्रतिक्रिया दिली आहे. “हर हर महादेव, सत्यमेव जयते, सुशांतला न्याय मिळणारच” अशा आशयाचं ट्विट करुन तिने समाधान व्यक्त केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एनसीबीने अंमली पदार्थ विकणाऱ्या करण अरोरा, अब्बास खेतान, झैद विलात्रा आणि अब्देल बसीत परिहार या चार तरुणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून शोविक, मिरांडा यांचा सहभाग स्पष्ट झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.

%d bloggers like this: