Take a fresh look at your lifestyle.

‘तिच्या’ मृत्यूची बातमी कळली अन् अनुपम खेर यांना धक्काच लागला; वाचा सविस्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची लाइन प्रोड्यूसर सराहना हिने अलीकडेच ३० जून २०२१ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत स्वतःचे आयुष्य संपवले. ती एक सुंदर व्यक्तिमत्व आणि कामाप्रती अत्यंत प्रामाणिक होती. मात्र, तिच्या मृत्यूची हि बातमी अत्यंत दुःखद आहे आणि हीच बातमी जेव्हा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना कळली तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कारण अलीकडे अनुपम खेर यांचे सराहनासोबत फोनवर बोलणे झाले होते. या नंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सराहनाला श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय तिचा एक मॅसेजदेखील शेअर केला.

अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘ही सराहना आहे. मी डेहराडून व मसूरीमध्ये शूटींग करत असताना तेव्हा ती काश्मीर फाइल्सची लाइन प्रोड्यूसर होती. गेल्यावर्षी २२ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या युनिटने सेटवर तिचा वाढदिवस देखील साजरा केला होता. लॉकडाऊनमुळे ती तिच्या अलीगड या गावी गेली होती. ती तिच्या कामात एकदम शानदार होती. माझ्या आईच्या वाढदिवसाला सराहनाने एक सुंदर मॅसेजही पाठवला होता. मी तिला फोन केला होता आणि आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या होत्या.

पण आज सराहना या जगात नाही, असा मॅसेज मला मिळाला. तिने ३० जूनला आत्महत्या केली. हा मॅसेज वाचून मला जबर धक्का बसला. मॅसेज मिळताच मी सराहनाच्या आईला लगेचच फोन केला. मात्र दुर्दैवाने तिच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे मला कळले. शिवाय डिप्रेशनमुळे सराहनाने इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली. डिप्रेशन आजच्या तरूणाईला गिळू पाहत आहे. मी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. तिची आई आणि भावाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. खूप दु:खद. ओम शांती…’असे लिहीत अनुपम खेर यांनी सराहनाच्या काही आठवणी आणि तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.