Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे डूग्गू; बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन साजरा करतोय 48 वा वाढदिवस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आज दिनांक १० जानेवारी आणि आज बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एका खास अभिनेत्याचा वाढदिवस आहे. हा अभिनेता म्हणजेच रोशन घराण्याचा कुलदीपक हृतिक रोशन. होय. आज हृतिकचा वाढदिवस आहे. मुख्य म्हणजे हृतिक अगदी ५० जवळ आलंय. कारण यंदाचा त्याचा हा वाढदिवस ४८ वा वाढदिवस आहे. सध्या जगभरातून हृतिकवर शुभेच्छा आणि आशीर्वादाचा पाऊस पडतोय. सोशल मीडियावर तर हॅशटॅग हॅप्पी बर्थडे हृतिक रोशन आणि हॅप्पी बर्थडे डूग्गू इतकच पाहायला मिळतंय. हृतिक रोशन याला प्रेमाने डूग्गू या नावाने ओळखले जाते.

अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी झाला. त्याला लहानपणापासून अभिनयाचे बाळकडू मिळाले ते आपल्या वडिलांकडून. त्याचे वडील अर्थात ९० मधील अतिशय लोकप्रिय बॉलिवुड अभिनेता राकेश रोशन. राकेश रोशन यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतः एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून नाव कमावले आहे. तर हृतिकने आपल्या वडिलांच्या नव्हे तर स्वतःच्या पायावर इंडस्ट्रीमध्ये एक घट्ट आणि मजबूत जागा मिळवली. कहो ना… प्यार है या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

 

तेव्हापासून त्याने मागे वळून पाहायचा कधी विचारच केला नाही. यानंतर त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. आतापर्यंत त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 

कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, धूम 2, मुझसे दोस्ती करोगे, वॉर, क्रिश आणि सुपर ३० या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची एक वेगळीच सीमा दर्शविली आहे. तर जोधा अकबर, मोहेंजोदडो यासारख्या ऐतिहासिक कथानकाचा पाया असणाऱ्या चित्रपटांमध्ये ह्रतिकने अव्वल कामगिरी करीत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. हृतिकने त्याच्या आयुष्यातील सर्वात पहिला अवॉर्ड त्याच्या सर्वात पहिल्या चित्रपटासाठी चित्रपट सृष्टीतील पदार्पण आणि उत्तम अभिनय यासाठी पटकावला होता. यानंतर २०११ साली त्याने टेलिव्हिजन डान्स रिॲलिटी शो जस्ट डान्स हा परीक्षक म्हणून गाजवला होता.