Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड अभिनेत्री कैटरिना कैफ झाली कोरोना बाधित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील लोकप्रिय अभिनेत्री कैतरीना कैफ हि कोरोना बाधित झाली आहे. कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट पॉसिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. ह्या संदर्भातील माहिती खुद्द तिने आपल्या इंस्टाग्राम वरील ऑफिशियल अकाउंटवरून दिली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना तिने म्हटले आहे कि, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, मी तातडीने स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे आणि मी सध्या होम क्वारंटाईन राहणार आहे.”

katrina-kaif-1_202011134483

तिने असेही म्हटले आहे कि, ” मी डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करीत आहे. तसेच मी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला अशी याचिका करते कि त्यांनी आपापली टेस्ट करून घ्यावी. आपल्या प्रेम आणि पाठबळासाठी आभार! सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या.”

Katrina's Post

गेल्या काही दिवसात कोरोनाची लाट बॉलीवूडला देखील आपल्या विळख्यात ओढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. या आधी अक्षय कुमार, आमिर खान, आलीया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, भूमी पेडणेकर, विकी कौशल, तसेच निर्देशक संजय लीला भंसाली, गायक आदित्य नारायण, कॉमेडियन कृणाल कामरा तसेच दिग्दर्शक शशांक खेतान हे सर्व देखील कोरोना बाधितांच्या यादीत दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.