Take a fresh look at your lifestyle.

बर्थडे स्पेशल: आमिर खानची काही थ्रोबॅक छायाचित्रे पहा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान यंदा आपला वाढदिवस ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या सेटवर साजरे करणार आहे. आमिर सध्या आपल्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आमिर खानचा हा ५५ वा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस १४ मार्च १९६५ रोजी मुंबई येथे झाला. आमिर प्रत्येक वेळी एका नवीन चित्रपटासह नवीन संकल्पना घेऊन येतो, प्रेक्षकांना ते आवडतही. आमिरने आपल्या करिअरची सुरूवात ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने केली होती. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आमिरचा वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याचे काही थ्रोबॅक फोटो दाखवतोय.

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

aamir khan birthday special

आमिर खानने आपल्या ३० वर्षांहून अधिक बॉलिवूड कारकिर्दीत खूप सुपरहिट चित्रपट दिले आहेत.दरवर्षी त्याची एक सुपरहिट फिल्म येते. त्याने मंगल पांडे, दिल चाहता है, रंग दे बसंती, रंगीला, अंदाज अपना अपना, पीके, सिक्रेट सुपरस्टार, ३ इडियट्स असे अनेक हिट चित्रपट केले आहेत.

आमिर खान सध्या करीना कपूरसोबत ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. आमिरचे बरेचसे लुक या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १९९४ च्या फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. आमिर खानचा लालसिंग चड्डा डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.