Take a fresh look at your lifestyle.

सेल्फ आयसोलेशनमध्ये असलेल्या सोनमने शेअर केला थ्रोबॅक फोटो

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लंडनहून परत आल्यानंतर १४ दिवसांपासून स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तिच्यासमवेत तिचा पती आनंद आहूजा देखील आहेत. ती कुटुंबातील इतर सदस्यांना भेटुही शकत नाही. अशा परिस्थितीत तिला तिचे वडील अनिल कपूर आणि बहीण रिया कपूर यांची आठवण येत आहे.

सोनमने इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघी बहिणी वडील अनिल कपूर सोबत खेळत आहेत.तिने ‘मिस यू’ असे या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यानंतर अनिल कपूर यांनीही तिला आणि आनंदला आपण मिस करत असल्याची प्रतिक्रिया दिली.


View this post on Instagram

 

Miss you @anilskapoor and @rheakapoor

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on Mar 22, 2020 at 9:36pm PDT

 

कोरोनामुळे सोनम आणि आनंद दिल्लीत सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. याशिवाय रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक स्टार्स घरिच बसून आहेत.देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 


View this post on Instagram

 

🙏 gratitude 📸 @ase_msb

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on Mar 22, 2020 at 5:06am PDT