Take a fresh look at your lifestyle.

सुशातंच्या आत्महत्येची CBI चौकशी करा; गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं केली गृहमंत्री शहांकडे मागणी

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चर्चा काही केल्या संपत नाही आहे. सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. या काळात पोलिसांच्या चौकशीत सुशांतने आत्महत्याचं केल्याचं समोर आलं आहे. परंतु, अजूनही सुशांतच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाही आहे. अशा वेळी त्याचे चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत असतांना सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनं गृहमंत्री अमित शहांकडे सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण समोर येण्यासाठी आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अमित शहा सर, मी सुशांतची गर्लफ्रेंड. सुशांतच्या अकस्मात निधनाला आता एक महिना होऊन गेलाय. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी हात जोडून विनंती करते की, या प्रकरणाची सीबीआय द्वारे तपास करण्यात यावा. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सुशांतवर अशा कोणत्या प्रकारचा दबाव होता ज्यामुळं त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे’, असं रियानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुशांतच्या निधनानंतर रियाला येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या
१४ तारखेला सुशांतच्या मृ्त्यूला एक महिना झाल्यापासून रिया सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तिनं त्याच्यासाठी भावुक पोस्ट शेअर करत त्याच्याबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. आज तिनं आणखी काही पोस्ट शेअर करत सुशांतच्या निधनानंतर तिला धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा रिया जबाबदार असल्याचं सुशांतच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं गेल्या एका महिन्यापासून तिच्यावर सातत्यानं टीका होत आहे. याच टीकेला उत्तर देण्यासाठी तिनं आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. रियाला अनेकप्रकारच्या धमक्या येत आहेत. रियानं यातील काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ट्रोल करणाऱ्या व्यक्तीनं लिहिलं की, जर रियानं आत्महत्या केली नाही तर तिच्यावर बलात्कार करण्यात येईल आणि तिची हत्या करण्यात येईल.

Comments are closed.