Take a fresh look at your lifestyle.

धोनी, युवराज नाही तर दीपिकाला आवडतो ‘हा’ क्रिकेटर…

0

चंदेरी दुनिया । बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे लग्नापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटर्स सोबत नाव जोडण्यात आले होते. पण दीपिकाने मागील वर्षी अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिला आवडणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले. राहुल द्रविड हा माझा आवडता क्रिकेटपटू असल्याचे तिने सांगितले. यावेळी दीपिकाने जीवनातील खेळाचे महत्त्वसुद्धा विषद केले. दरम्यान लवकरच दीपिका छपाक आणि ८३ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीमुळे राहुल द्रविड हे माझे आदर्श नाहीत. तर राहुल द्रविड यांनी स्वतःला ज्याप्रमाणे सांभाळले त्यामुळे ते माझे आदर्श आहेत. माझ्यासाठी राहुल हे असे व्यक्ती आहेत ज्यांची मी प्रशंसा करते एवढेच नाही तर ते बेंगळुरुचे स्थायिक आहेत. आणि म्हणूनच ते माझे आदर्श आहेत.

दरम्यान दीपिकाच्या आगामी छपाक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून अंगावर काटा उभा राहतो. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात दीपिका मालतीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका पदुकोण रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदाच क्रिकेटचा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यावर आधारित हा चित्रपट असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.