Take a fresh look at your lifestyle.

हरियाणवी डान्सिंग क्वीन सपना चौधरी पूसतेय फरशी; हा डान्स व्हिडीओ नाहीये, पण तरीही होतोय वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सपना चौधरी ‘बिग बॉस ११’ मध्ये झळकल्यानंतर विशेष प्रकाशझोतात आली होती. बिग बॉसनंतर तिची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच गेली. लोक तिला ओळखू लागली. आपल्या मोहक अदा आणि डान्सच्या जोरावर तिने भल्याभल्याना वेड लावले. तिचे सगळेच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होतात. पण लोकांची आवडती हरियाणवी डान्सिंग क्वीनचा चक्क फरशी पुस्तानाचा व्हिडीओ समोर आलाय. पण चाहते तिच्या या व्हिडीओवरही भरभरून कमेंट्स करत आहेत. इतकेच नव्हे तर तिचा हा व्हिडीओ देखील तितकाच वायरल होतोय जितके तिचे डान्स व्हिडीओ वायरल होतात.

सपना चौधरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करणे जणू तिचा छंदच आहे.सोशल मीडियावर कलाकार मंडळी लॉकडाऊन दरम्यान कोणत्या गोष्टी करतायेत त्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अशात हरियाणवी डान्सिंग क्वीन सपना चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. घरात वेळच वेळ असल्याने स्वतः काम करत वेळ घालवत आहे. घरात फरशी लक्ख करताना दिसत आहे. एरव्ही सपना चौधरीचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. आता घरकाम करणारे व्हिडीओ देखील धुमाकुळ घालत आहेत. स्टायलिश अंदाजात दिसणारी सपना घरातले काम करताना मात्र अगदी सध्या सुध्या घरगुती कपड्यांमध्ये दिसतेय. घरातले काम, मुलाचा सांभाळ करण्याबरोबरच ती तिच्या फिटनेसवरही लक्ष देत आहे.

गेल्याच वर्षी वीर साहू यांनी सपना आणि त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता. जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी जानेवारीत लग्न केले होते.ऑक्टोबर महिन्यात सपनाने मुलाला जन्म दिला होता. आई झाल्यानंतर सपनाचे वजन वाढले होते. मात्र तिने आपले वाढलेले वजन कमी केले असून ती पुर्वी प्रमाणेच आता पुन्हा ग्लॅमरस दिसू लागली आहे. अलीकडेच तिने एक फोटोशूटही केले आहे ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.