Take a fresh look at your lifestyle.

हॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बाला सुद्धा कोरोना ची लागण…व्हिडीओ केला शेअर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । हॉलीवूडचा ज्येष्ठ अभिनेता इद्रीस एल्बाने जाहीर केले आहे की त्याला कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ट्विटरवर बोलताना अभिनेता म्हणाला, “आज सकाळी तपासणीनंतर मला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे समजले. मला ठीक वाटत आहे, आतापर्यंत माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, परंतु विषाणूमुळे मला बाजूला ठेवले आहे. “

४७ वर्षीय अभिनेत्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो आपली पत्नी सबरीना धौरेसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये इद्रीस असे सांगताना दिसत आहे की त्याची पत्नीची अद्याप चाचणी झालेली नाही आणि सध्या तो ठीक आहे.

 

गोल्डन ग्लोब जिंकणार्‍या अभिनेत्याने पुढे म्हटले आहे की जेव्हा शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी त्याची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्याला कळले की व्हायरस झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात तो आलाय.त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “ही एक गंभीर समस्या आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांपासून दूर राहून आपले हात धुण्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.” इद्रीसने आपल्या चाहत्यांना सावध राहण्याचा सल्लाही दिला..

 

Comments are closed.