Take a fresh look at your lifestyle.

..असहिष्णुता कुठे आहे? रवीना टंडन करतेय ओवैसींचे समर्थन..?; एका ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकलं होतं आणि दरम्यान त्या ठिकाणी एमआयएमचे खा. इम्तियाज जलील, नेते वारिस पठाण देखील होते. या कृत्याबद्दल महाराष्ट्रात एकूणच तीव्र संतापाची लाट उसळली असताना आता नेटकऱ्यांच्या रोषाचा मोर्चा अभिनेत्री रवीन टंडनकडे वळताना दिसतोय. तिने ओवैसींच्या कृतीचे समर्थन केल्याचे म्हणत सोशल मीडियावर अत्यंत संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण ठरले आहे रवीनाने केलेले ट्विट. होय तिने केलेल्या एका ट्विटमुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

या संदर्भात अभिनेत्रो रवीना टंडन हिने एक ट्विट केलं आहे आणि याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘काही काळापूर्वी माझ्या मातृभूमीला ‘असहिष्णू’ असं लेबल लावणं म्हणजे एक फॅशन बनलं होतं. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता कुठे आहे’, असा सवाल तिने यातून केला आहे. या ट्विटसोबत तिने लेखक आनंद रंगनाथन यांचदेखील एक ट्विट शेअर केलाय आणि त्यावर प्रतिक्रिया देत लिहिले आहे कि, ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. हा एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहे’. लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकणाऱ्या ओवैसींचा फोटो शेअर केला होता.

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुल्ताबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर आपला माथा टेकवला आणि नतमस्तक झाले होते. यानंतर या प्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एक वेगळाच वाद निर्माण झाला. या वादाला पूर्णपणे राजकीय वळण एव्हाने माळले आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही आघाडीच्या पक्षांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर शिवसेनेचे औरंगाबाद येथील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि, “मुस्लीम लोक औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत. कारण औरंगजेब दुष्ट होता. मुस्लीम आणि हिंदू समाजाला त्याने त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा हिंदू मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”