Take a fresh look at your lifestyle.

‘जान्हवी कपूरचे बैठकी भाव, घेई मनाचा ठाव’; पहा कातिल व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक आणि घायाळ करणाऱ्या अदांमूळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल लाईफ सक्रिय रित्या जगते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा वेगळा असा मोठा चाहता वर्ग आहे. यामुळे फोटो असो किंवा मग व्हिडीओ.. जान्हवीने पोस्ट केला कि तो व्हायरलही होतो आणि चर्चेतही येतो. पण यावेळी जान्हवी काही बोल्ड लूकमुळे चर्चेत नाही तर बैठकीच्या अदांमुळे चर्चेत आहे. होय. जान्हवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बसलेली दिसतेय आणि बसून बैठकीचे नृत्य तसेच चेहऱ्यावर मोहक भाव दर्शविताना दिसत आहे.

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यामुळे पर्सनल ते सोशल लाईफपर्यंत सगळ्या बातम्या ती स्वतःच चाहत्यांपर्यंत पोहचवते. हा व्हिडीओ २ वर्षांपूर्वी नृत्य कलेचा अभ्यास करतानाचा असल्याचे जान्हवीने कॅप्शनमध्ये सांगितले आहे. जान्हवीने हा व्हिडीओ पोस्ट करीत सोबत कॅप्शन लिहिले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे कि, २ वर्षांपूर्वी… माझ्या पहिल्या बैठकी भावांपैकी एक प्रयत्न. सर्वांना आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या शुभेच्छा! मला २ दिवस उशीर झाला असला तरीही..

या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रित उमराव जान चित्रपटातील बहारदार गाणे ‘इन आँखो कि मस्ती के’ वर बैठकीचे नृत्य केले आहे. जान्हवीने परिधान केलेला ड्रेस आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव या गाण्याला अतिशय साजेसे आहेत. तिच्या नजरेतील नम्रपणा आणि हवं भावातील आपलेपणाची ओढ या नृत्यातून दिसतेय.

जान्हवीच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील मित्र मंडळींनीही तिच्या नृत्याचे विशेष कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.