Take a fresh look at your lifestyle.

भारत पाकिस्तान सीमेवर जवान करत होते भांगडा डान्स; सेहवागने शेयर केला व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | करोनामुळे सध्याच्या घडीला सर्वच जण चिंतेत आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेवर नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. पण सध्याच्या करोनाच्या काळात भारतीय जवान नेमके काय करत आहेत. हे दाखवणारा व्हिडीओ भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते. कारण कधी हल्ला होईल, हे सांगता येत नाही. पण जेव्हा माणसं आनंदी राहतात तेव्हा ते जास्त फिट असतात आणि जास्त आयुष्य जगतात, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्याच्या करोनाच्या काळातही भारतीय जवानांनी आनंद राहण्याचा एक मार्ग निवडला आहे.

भारतीय जवानांचे काम हे सर्वांनीच पाहिले आहे. डोळ्यात तेल घालून त्यांना अहोरात्र काम करावे लागते. त्यामुळे तणाव झटकून टाकण्यासाठी भारतीय जवान काहीना काही गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळते. करोनाच्या काळातही भारतीय जवान तणावापासून दूर राहण्यासाठी खास शक्कल लढवत आहेत.

सेहवागने जो हा व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या सीमेवरील भारतीय जवान हे भांगडा नृत्य करत आहेत. हे नृत्य करून आपला तणाव दूर करण्याचे काम भारतीय जवान करत आहेत. सेहवागने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्याने काही ओळीही लिहिल्या आहेत. सेहवागने लिहिले आहे की, ” पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय जवान भांगडा करून आनंद साजरा करत आहेत. हे पाहताना मला अतीव आनंद होत आहे. त्यांच्यामधील एनर्जी कमाल आहे. जय जवान!”

Comments are closed.