Take a fresh look at your lifestyle.

…जयंती जरूर साजरी करावी! पण.., ; किरण मानेंची पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगात कुठेही काहीही चालू असेल तर त्यावर आवर्जून भाष्य करणारे अभिनेता किरण माने यांच्याविषयी बोलू तितकं कमीच. प्रत्येक विषयावर ते आपलं परखड आणि स्पष्ट मत मांडताना दिसतात. अलीकडेच त्यांनी केलेली पोस्ट परत एकदा चर्चेत आली आहे. याआधी त्यांनी लिहिलेली अशी एकही पोस्ट नाही जी चर्चेत आलेली नाही. पण या सर्व पोस्ट राजकीय आणि सामाजिक विषयांशी संबंधित होत्या. यानंतर आता सोशल मीडियावर महामानवांच्या जयंतीवर किरण माने यांनी आपलं मत लिहिलं आहे. त्यांची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर धगधगता विषय झाली आहे.

किरण माने यांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मानेंनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते भगवान बौद्धांच्या प्रतिमेसह दिसत आहेत. याशिवाय फोटोत एका बाजूला संभाजी महाराजांचा देखील फोटो दिसत आहे. हि पोस्ट लिहिताना त्यांनी लिहिले कि, “…जयंती जरूर साजरी करावी. आपल्या महामानवांविषयीची कृतज्ञता असते ती. पण मला लै मनापास्नं असं वाटतं की, ही जयंती डिजे लावून, मिरवणूका काढून नाही, तर त्यांच्या विचारांचे पुन:पुन्हा स्मरण करून, ते विचार आजच्या गढूळ झालेल्या भवतालात कसे मार्गदर्शक ठरतील यावर चर्चा करून साजरी व्हावी. असं काम करणारे लोक जेव्हा मला आवर्जुन संवाद साधायला बोलावतात तेव्हा लै लै लै समाधान वाटतं दोस्तांनो !”

या पुढे त्यांनी पोस्टमधे त्यांना आमंत्रित केलेल्या जयंतीसाठीच्या विविध कार्यक्रमांद्दल लिहीले आहे. “बुद्धजयंती आणि छ. संभाजी महाराज जयंती उत्सवात आपणा सर्वांबरोबर बोलायला येतोय…”असेही त्यांनी शेवटी लिहिले आहे. आणखी एक पोस्ट त्यांची चर्चेत आहे. ज्यामध्ये ते पुन्हा एकदा बुद्ध प्रतिमेसोबत झळकत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी शिल्पकार भगवान रामपुरेंच्या कलाविश्वात असा हॅशटॅग दिला आहे. यासोबत त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय कि, द्वेषाविरोधातला विद्रोह – प्रेम करणं
असत्याविरोधातला विद्रोह – सत्य शोधणं
गुलामगिरीविरोधातला विद्रोह – स्वातंत्र्य मिळवणं
विषमतेविरोधातला विद्रोह – समता मानणं
अन्यायाविरोधातला विद्रोह – न्याय देणं
पाठीमागून अंगावर चाल करून येणार्‍या
‘निर्बुद्ध’ सांडांबरोबर,विवेकी विचारांनी ‘युद्ध’ खेळणं : ‘बुद्ध’ अंगीकारणं !
– किरण माने.