'जून' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
‘जून’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक दिग्दर्शक निखिल महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून प्रदर्शित केला. निखिल महाजन यांचा हा ४था चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत तर त्यांच्या सोबतच किरण करमरकर आणि रेशम हेही दिसणार आहेत. ‘रेशम’ या नवोदित अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट असेल. हा चित्रपट नव्या वर्षात २०२० मध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर रितेश देशमुखनेही त्याच्या इन्स्टावरून शेअर केले आहे. या आधी दिग्दर्शकाचा ‘बाजी’ हा बिग बजेट चित्रपट आला होता, जो लोकांना तितकासा भावला न्हवता. त्यामुळे या नव्या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत. निखिल महाजन सध्या शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज’ प्रोडक्शनसाठी ‘बेताल’ नावाची वेबसिरीजसुद्धा दिग्दर्शित करत आहे.
