Take a fresh look at your lifestyle.

‘गंगू, ये लढाई तुझे जितनी है! भाऊ- बहिणीच्या नात्याचे भाष्य करणारा ‘गंगूबाई काठियावाडी’चा नवा ट्रेलर प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संजय लीला भन्साली यांचा बहुचर्चित चित्रपट गंगुबाई काठियावाडी हा गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर गंगुबाईंच्या समर्थकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या कथानकाला काळे झेंडे दाखवले. मात्र विना वाद रिलीज होईल तो भन्सालींचा चित्रपट थोडीच.. यानंतर आता गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचा दुसरा आणि नवाकोरा करकरीत ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर शनिवारी रिलीज झाल्यानंतर चांगलाच चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी‘ हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा एक ट्रेलर चांगलाच वादात अडकल्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण या ट्रेलरमध्ये आलिया आधीपेक्षा वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय. शिवाय या नव्या ट्रेलरमध्ये गंगूबाई आणि करिम लाला यांची केमेस्ट्री पहायला मिळतेय. करिम लाला आणि गंगूबाई यांचे मोठा भाऊ आणि लहान बहिण असे जिव्हाळ्याचे नाते होते. भावाचं नातं होतं. त्यांच्यातील बांध दर्शविणारा हा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडतोय.

या ट्रेलरच्या शेवटी करिम लाला गंगूबाईला बोलताना दिसत आहेत कि, गंगू तुला ही लढाई जिंकावीच लागेल. हा डायलॉग जबरदस्त हिट जातोय आणि हा ट्रेलरलही तुफान गाजतोय. या ट्रेलरला आतापर्यंत ४६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आलियाने इंस्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया गंगुबाईंच्या मुख्य भूमिकेत तर अजय देवगण करीम लाला यांची भूमिका साकारताना दिसत आहेत.