मलायकासोबत लग्न कधी करणार? अर्जुन कपूर म्हणतो…

Sharing is caring!

मुंबई | मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाची चर्चा मागील दोन महिन्या पासून बॉलीवूडमध्ये चांगलीच रंगत आली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका याच्यात भेटी गाठी झाल्या , ते सोबत जेवायला हॉटेलमध्ये गेले कि त्याच्या बातम्या होतात. तसेच लोक त्याला चर्चेचा विषय बनवतात एवढे यांचे नाते लोकांची चर्चेचा विषय झाले आहे.

आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरने आपल्या लग्नाबद्दल खुलेपणाने एक विधान केले आहे. आपण जून मध्ये लग्न करणार आहे. मात्र मला एवढ्या लवकर लग्न करण्यासाठी मन करत नाही. कारण मी आत्ता कुठे ३३ चा झालो आहे. मी जर लग्न केले तर लोक माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या वयाची चर्चा करतील आणि ती चर्चा मला आवडणार नाही. पण लोकांना माझ वय किती आहे याची कुठून ना कुठून माहिती मिळेलच म्हणून मी जून मध्ये लग्न करणार आहे असे अर्जुन कपूर म्हणाला आहे.

मलायका बद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला कि मलायका माझ्यासाठी खूप काह्स व्यक्ती आहे. मात्र मला माझ्या खासगी जीवनाबद्दल बोलू वाटत नाही. परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यात खास माणस असावी असे मला वाटते. मी स्व:तालाखूप नशीबवान समजतो कारण माझ्या आयुष्यात अशी खूप खास माणसे आहेत.

Leave a Reply