‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं ‘कडक’ आइटम सॉन्ग !

Sharing is caring!

मुंबई | अर्जुन पटियाला’ चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सांगितले होते की, यामध्ये एक मैनडेटरी आइटम सॉन्गही आहे. त्या दरम्यान गाण्यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीची एक झलक पहायला मिळाली होती. यामध्ये दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि सनी लिओनी दिसत आहे. हे गाणे सिंगर गुरु रंधावाने गायले आहे. यामध्ये सनीचे किलर मूव्स पहायला मिळत आहे.

कृतिने हे गाणे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. कृतिने लिहले की, ‘जसे आम्ही वचन दिले होते की, या चित्रपटामध्ये सनी आहे.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराजने केले आहे. चित्रपटात कृति सेननने एक रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त दिलजीत दोसांझ एसीपी अर्जुन पटियाला आणि फुकरे फेम वरुण शर्मा डीसीपी ओनिडा सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे.

या आधी अभिनेता दिलजीतने ‘उडता पंजाब’ आणि ‘फिल्लौरी’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. या व्यतिरिक्त दिलजीत अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी देखील दिसणार आहे.

Leave a Reply