स्वरा भास्करने केला या लेखकासोबत ब्रेकअप

Sharing is caring!

मुंबई | वादग्रस्त टि्वट करून नेहमी चर्चेत राहण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे प्रेमाचे सूर बिघडले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्वरा लेखक हिंमाशु शर्मा याच्याबरोबर डेटींग करत होती. पण आता दोघांचे पटेनासे झाल्याने त्यांनी सामजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वरा आणि हिंमाशु यांनी तनु विथ मनु ,रांजना, आणि नील बट्टे सन्नाटा या तीन चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. तनु विड मनु रिटर्न्स या चित्रपटात एकत्र काम करत असताना स्वरा आणि हिंमाशुचं सूत जुळले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघे सगळीकडे एकत्र हिंडू फिरू लागले.

त्यामुळे त्यांच्या प्रेमाची चर्चा सगळीकडे रंगली. ‘वीरे दी वेडींग’ च्या यशानंतर स्वरा आणि हिंमांशु युरोपलाही फिरायला गेले होते. तसेच गेल्या वर्षी स्वराच्या भावाच्या लग्नासाठीही हिंमांशु लखनौला गेला होता. त्यावेळी स्वराच्या कुटुंबीयांची त्याने भेटही घेतली होती. त्यामुळे भावानंतर आता स्वराही लग्नाच्या तयारीला लागल्याच्या चर्चा रंगल्या. पण आता स्वरा आणि हिंमांशु यांनी दोन्ही कुटुंबीयांना विश्वासात घेऊन ते वेगळे होत असल्याचे सांगितले.

Leave a Reply