Take a fresh look at your lifestyle.

एजाज खान म्हणे, ‘तो मी नव्हेच’ ; एकाच नावामुळे चाहत्यांचा उडाला गोंधळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कित्येकदा दोन व्यक्तींचे एक नाव असते. मग अश्या वेळी ‘लेकी बोले, सुने लागे’ असा प्रकार पाहायला मिळतो. यावेळी २ कलाकारांच्या बाबत असेच काहीसे घडले आहे. एजाज खान या नावामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्या कारणी अभिनेता एजाज खान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रोज त्याच्या ड्रग्स संबधित येणा-या नवनवीन बातम्यांमुळे बिग बॉस१४ फेम अभिनेता एजाज खानसाठी डोकेदुखी होऊ लागली आहे.

बिग बॉस फेम एजाज खान या अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली, अशा बातम्या प्रसारित होत आहेत. ही बातमी एका एजाजसाठी खरी असली तरी दुसऱ्या एजाजसाठी खोटी आहे. कारण दोन्ही एजाज खान अभिनय क्षेत्रात काम करीत असून दोघेही बिग बॉस रिऍलिटी शो चे स्पर्धक होऊन गेले आहेत. त्यामुळे या नावात उडणारा गोंधळ फारच स्वाभाविक आहे. त्यामुळे फक्त नावच सेम आहे, दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, असे एजाज खानला रोज सांगावे लागत आहे.

खरंतर एजाज खान हे नाव ऐकताच ‘बिग बॉस १४’ मध्ये झळकलेला एजाज खान डोळ्यासमोर येतो. त्यामुळे आरोप लावले जात असलेला एजाज हाच असेल, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर जोरदार टीका केल्या जात आहेत. म्हणूनच आता ड्रग्स प्रकरणात अडकलेला एजाज खान मी नव्हे असे सांगण्याची या अभिनेत्यावर वेळ आली आहे नावात काय ठेवलय असा डायलॉग आपण ऐकला असेलच. मात्र नावात काय ठेवलय याचे प्रत्यक्षदर्शी उदाहरण एजाज खानला मिळाले आहे. “लोक मला संशयाच्या नजरेनं पाहतात, माझ्या खाजगी आयुष्यावर याचा प्रचंड वाईट परिणाम होत आहे. लोकांना तरी मी किती समजवणार? वारंवार मला माझी ओळख पटवून द्यावी लागत आहे.” त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ड्रग्स प्रकरणाच्या केसमध्ये NCB ने अटक केलेला एजाज खान हा बिग बॉस सीजन ७ मधील स्पर्धक होता. त्यानंतर ​२००९ मध्ये रिलीज झालेल्या ‘एक: द पावर ऑफ वन’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘लम्हा’, ‘अल्लाह के बंदे’, ‘रक्त चरित्र २’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘बादशाह’, ‘हार्ट अटॅक’ आणि ‘टेंपर’ या चित्रपटांमध्ये दिसला. तसेच २०२०मध्ये त्याचा चित्रपट ‘गुल मकाई’ रिलीज झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.