Take a fresh look at your lifestyle.

प्रिया बापट म्हणते, ‘गो कोरोना गो…’; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत सुधारल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान आता अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला कॅप्शन म्हणून तिने गो कोरोना गो असे लिहिले आहे.

सध्या प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक रील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने गो कोरोना गो असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत प्रिया ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गाणं गाताना दिसतेय. प्रियाच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. कित्येक जण कमेंट्स करीत आपली पसंती दर्शवित आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापटने १७ मार्च रोजी सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. उमेशने लिहिले होते की, दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्यावे.

एम एक्स प्लेअर वर दिसणारी उमेश आणि प्रिया ची “आणि काय हवं?” ही वेबसिरीज अतिशय लोकप्रिय झाली. आता पर्यंत या वेबसिरीज चे २ सीजन प्रदर्शित झाले असून अतिशय लोकप्रिय देखील झाले आहेत. उमेश आणि प्रियाने नुकतेच या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. मात्र त्या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.