Take a fresh look at your lifestyle.

मान मर्यादा विकलीस वाटतं; प्रियांका निकच्या बीच पिक्समूळे नेटकऱ्यांचा पारा चढला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स अर्थात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या बोल्ड आणि युनिक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. इतकेच काय तर प्रियांका तिच्या पतीसोबत अर्थात निक जोनास सोबत अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये हटके लूकमध्ये दिसते. इतरांपेक्षा नेहमीच युनिक राहणं जणू या कपलचा छंद आहे. पण यावेळी प्रियांका तिच्या पतीसोबत मस्त बीचवर संडे एन्जॉय करताना दिसली. प्रियांकाचा हा मस्त मौलाना अंदाज भले युनिक आणि बोल्ड होता पण काही चाहत्यांना मात्र तो काही भावला नाही. अनेकांनी प्रियांकाच्या या फोटोवर आक्षेप घेत तिला लाज, लज्जा, मान, मर्यादा आणि भारतीय संस्कृतीची आठवण करून देण्याचा जणू पवित्राच उचलला.

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंका तिचा पती निक जोनाससोबत दिसत आहे. मुख्य म्हणजे या फोटोंमध्ये बिकिनी घातलेली प्रियंका कितीही बोल्ड आणि भारी दिसत असली तरीही हा फोटो शेअर करताना प्रियंकाने स्वतःलाच स्रॅक्स म्हटले आहे.अहो इतकेच काय तर निक काटा चमचा घेऊन बसलेला दिसत आहे. त्यामुळे हा फोटो पाहून काहींचा पारा चांगलाच चढला. मग काय या लोकांनी प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलं. भारतातून गेलीस म्हणून काय सर्व लाज विकून खाल्लीस काय? अशी विचारणा करीत अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे. याशिवाय अनेकांनी अर्वाच्य भाषेचा वापर करीत प्रियांकाला ट्रॉल करण्याचा पर्यतबं केला आहे.

‘कर दिया भारत का नाम रोशन,’ अशा उपरोधिक शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. याशिवाय, तुला वेड लागलंय काय, विदेशी मुलासोबत लग्न केलंस याचा अर्थ भारतीय संस्कृती विसरून जाशील असा होत नाही, असेही एका युजरने म्हटले आहे.

तर अन्य एका युजरने लिहिले कि, आता हेच पहायचं बाकी होतं, अशी कमेंट करीत प्रियांकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालंच तर, ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात ती दिसल्यानंतर तिने आपला मोर्चा थेट हॉलिवूडकडे वळवला आहे. सिटाडेल, टेक्स्ट फॉर यू, मॅट्रिक्स ४ या हॉलिवूड चित्रपटात ती लवकरच दिसणार आहे.