Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंत अडकणार पुन्हा एकदा लग्नबेडीत, कोण आहे नवरदेव?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस फेम आणि बॉलीवूड आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती तिने स्वतःच दिली आहे. राखी नेहमीच विवाहीत असल्याचा दावा करत असते.मग आता पुन्हा कोणाशी लग्न करणार यास प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचे सरळ सोप्पे उत्तर असे कि, अभिनेत्री राखी सावंत कोण्या अभिनेत्यासोबत नाही तर पुन्हा तिचा नवरा रितेशसोबतच लग्न करणार आहे. राखीचे म्हणते की रितेशला भारतात येऊन पुन्हा तिच्याशी लग्न करायचे आहे आणि यावेळी तो सर्वांसमोर तिच्यासोबत लग्न करणार आहे.

व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून माझे रितेशसोबत बोलणे होत असते. त्याच्या व्हिसामध्ये काही तरी समस्या येत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत ज्या पूर्ण करत आहे. त्यानंतर त्याला सर्वांना आमच्याबद्दल सांगायचे आहे. त्याने मला सांगितले की, तो आमच्या नात्याबद्दल सर्वांसमोर खुलेआम बोलणार आहे. उलट, यावेळी तो पुन्हा माझ्याशी लग्न करणार तेही सर्वांसमोर. अशी माहिती राखीने ईटाइम्सच्या रिपोर्ट मध्ये दिली.

राखीने २०१८ साली रितेशसोबत लग्न केले होते. राखीने इंस्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटोसुद्धा शेअर केले होते ज्यात ती वधूच्या गेटअपमध्ये मंडपात बसलेली दिसते आहे. या फोटोत राखीचा नवरा रितेश दिसत नव्हता. मात्र राखीच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. आजपर्यंत तिच्या नवऱ्याला कुणीच पाहिलेले नाही. राखीचा नवरा कधीच तिच्यासोबत मीडियासमोर आला नाही तर कधी तिच्या मित्र मैत्रिणींना देखील भेटला नाही. त्यामुळेच लोक राखीच्या लग्नाला पब्लिसिटी स्टंट मानतात. मात्र ती नेहमीच तिचे रितेशसोबत लग्न झाल्याचे सांगत असते.

नुकत्याच झालेल्या बिग बॉस सीजन १४ मध्ये राखीने आपल्या लग्नात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता. प्रसिद्ध गायक राहुल वैद्य ह्या प्रतिस्पर्ध्यासह बोलताना तिने सांगितले की, तिचा नवरा आधीपासूनच विवाहित आहे. शिवाय त्याला एक बाळदेखील आहे आणि ही गोष्ट रितेशने राखीपासून लपवली होती.
मात्र आता चित्र पालटताना दिसत आहे. सध्या अशीदेखील माहिती मिळत आहे की, राखी तिच्या नवऱ्यासोबत डान्सिंग रिएलिटी शो नच बलिएच्या आगामी सिजनमध्ये दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.