हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीसोबत लढत आहे. दररोज हा विषाणू अनेकांना आपल्या जाळ्यात ओढताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहेत. यामुळे ऑक्सिजन, औषधे व रुग्णालयातील बेड्सची कमतरता जाणवते आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अश्या काळात कोरोनाचा प्रसार प्रचंड झाला असला तरी मला किंवा माझ्या कुटुंबाला कोरोना होणार नाही असा दावा राखी सावंतने केला आहे. मात्र तिचा हा ठामपणा तिच्या चांगलाच अंगाशी आला आहे. नेटकऱ्यांनी हा मुद्दा उचलत तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतला नुकतेच मुंबईतील एका कॉफी शॉपच्या बाहेर पाहण्यात आले होते. तिच्यावर मीडियाच्या नजर पडल्या आणि ती कॅमेराच्या लेन्समध्ये पुन्हा झळकली. दरम्यान मीडिया फोटोग्राफेर्ससोबत बोलताना तिने दावा केला की, तिला कोरोना होऊ शकत नाही. जीसस तिच्यासोबत आहेत. तिच्यात पवित्र रक्त आहे. त्यामुळे कोरोना तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही. एवढेच नव्हे तर देशात सध्या कोरोना लसीचे प्रमाण कमी असल्याने माझ्या वाट्याची लस दुसऱ्या कोणाला तरी द्या. मला काय माझ्या घरातील कोणालाच कोरोना होणार नाही, असे देखील ती सांगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हीच राखी पीपीइ किट घालून भाजी खरेदी करताना दिसली होती.
राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. असे असून केवळ १८ तासांतच २ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक प्रचंड संख्येने कमेंट्स करत आहेत. राखी मास्क काढून बोलत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. कुणी तिला निष्काळजी म्हणताना दिसतंय तर कुणी तिला इमोशनल म्हणतय. तसेच ती काहीही बरळत असल्याचे नेटिझन्स कमेंटद्वारे सांगत आहेत. खऱ्या आयुष्यात असताना देखील बिग बॉसच्या घरात असल्यासारखीच ती वागते असे देखील लोक तिला सुनावताना दिसत आहेत. तसे कमेंट्सकडे पाहता लोकांना तिच्या दाव्याबाबत नेमके काय बोलावे हे सुचत नसल्याचे दिसत आहे. परिणामी या व्हिडीओवरील कमेंट्स संमिश्र दिसत आहेत.