Take a fresh look at your lifestyle.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलिवूडमध्ये असलेली ही घराणेशाही बाहेरील कलाकारांना येथे टिकू देत नाही अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. याच मुद्द्यावर काही सेलिब्रिटींनीही त्याचे मत व्यक्त केलेले आहे. अशातच अभिनेत्री रविना टंडन हिनेही सोशल मीडियावर एक ट्विट करत बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. “माझंही करिअर उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले होते”, असे रविनाने ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘ इंडस्ट्रीमध्ये अचानक तुम्हाला चित्रपटांमधून काढून टाकण्यात येते. तसेच हिरो त्याच्या गर्लफ्रेंडला चित्रपटात आणतो किंवा आपल्या काही मित्रांच्या मदतीने सामोर्च्याबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवून दुसऱ्यांचे करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. काही लोकं ते सहन करू शकतात तर काही ते सहन करू शकत नाहीत’, असे आरोप तिने आपल्या या ट्विटमध्ये केलेले आहेत.

 

 

तिने पुढे लिहिले की, ‘जर तुम्ही याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला नाटकी म्हटले जाते, वेडं ठरवलं जातं. हे या इंडस्ट्रीमधील खरं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकते. माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच ताकदीने मी लढा दिला. त्यावेळी अगदी घाणेरडं राजकारण सगळीकडे होतं. मला या इंडस्ट्रीबद्दल प्रेम आहे, पण इथे तणावसुद्धा खूप आहे. काही लोक खूप चांगले आहेत तर काही राजकारण करणारेसुद्धा आहेत. हे जग असंच आहे.’