Take a fresh look at your lifestyle.

सलमानच्या ‘किक २’ ची रिलीज डेट ठरली ‘या’ अभिनेत्री आहेत हिरोईनच्या स्पर्धेत !

0

टीम, हॅलो बॉलीवूड | २०१४ मध्ये सलमानचा ‘कीक’ रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच फ्रॅन्चाइजीचा दुसरा पार्ट ‘किक २’ घोषित करून वर्ष होत आलं, तरी त्याबद्दल एवढं बोललं गेलं नाही. पण आजच सूत्रांच्या माहितीनुसार, किक २ ची रिलीज डेट फिक्स झाली आहे.

यामध्ये हेरॉईन कोण असेल हे अजून ठरलेलं नसलं तरी पहिल्या भागात असलेली जॅकलिन फर्नांडिस, मोहेंजोदारो आणि आत्ता बॉक्स ऑफिसवर लूट चालवलेल्या हाऊसफुल्ल ३ मधली पूजा हेगडे, आणि त्यातलीच आणि सध्या ‘पाणिपत’मुळे चर्चेत असलेली क्रिती सॅनन या तिघींमधे चढाओढ चालली आहे. सलमानचा चित्रपट म्हटल्यावर बॉक्स ऑफिसचा गल्ला गरम असणार यात वाद नाही, त्याचा शेवटचा चित्रपट रस ३ त्याच्या नवा प्रमाणे चालला नसला तरीही व्यावसायिक दृष्ट्या तो अपयशी नक्कीच न्हवता. सलमान सोबत हमखास यश असल्याने तिघीही किक २ साठी उत्सुक असतील यात शंका नाही.

किक २ ची रिलीज डेट मात्र २०२१ मध्ये ढकलण्यात आली आहे. कारण सुपरस्टार सलमान सध्या या ख्रिसमसला दबंग ३ आणि त्यानंतर रमजान ईदला ‘राधे’ या ऍक्शनपटात बिझी असणार आहे. त्यामुळे प्रोड्युसर आणि डिरेक्टर असणारा साजिद नाडियादवाला वेळ घेऊन ईदनंतर शूटिंग सुरु करणार आहे. प्री प्रोडक्शन, शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन असे मिळून त्याने वर्ष घेतले आहे, त्यामुळे चित्रपट २०२१ मध्ये ईद दिवशी म्हणजे १३ मे ला रिलीज होईल. बॉक्स ऑफिसवर सलग ४ दिवसांच्या सुटीचा पुरेपूर फायदा घेण्याची निर्मात्यांची योजना असावी.

‘kick 2’ date is announced

Jaqueline, Kriti and Pooja are the contenders.

Leave a Reply

%d bloggers like this: