Take a fresh look at your lifestyle.

‘इंटिमेट’ सीन्सनंतर तासन् तास रडायची ‘ही’ अभिनेत्री…

0

चंदेरी दुनिया । प्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारीनं आपला डिजिटल डेब्यू केला आहे. तिची वेब सीरीज हम तुम और देम लवकरच अल्ट बालाजीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. अक्षय ओबेरॉय तिच्या सोबत प्रमुक भूमिकेत आहे. यातील खास बात म्हणजे दोघांचे बोल्ड आणि रोमँटीक सीन्स आहेत. यात श्वेतानं अनेक लिप लॉक सीन्स दिले आहेत. श्वेताची ही पहिलीच वेळ आहे.

श्वेता सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, तिची मुलगी पलक तिवारीनं जेव्हा श्वेताचे इंटीमेट सीन पाहिले तेव्हा तिनं श्वेताला हे सीन अशा प्रकारे करण्यास सांगितले जसे की दुसऱ्या 2019 मधील अभिनेत्री करतात. श्वेता म्हणाली, ‘मी जेव्हा जेव्हा असे सीन शुट करत होते तेव्हा काही भाग शुट झाल्यानंतर मी पळत जाऊन व्हॅनिटीमध्ये स्वत:ला बंद करत होते. तिथे जाऊन मी रडायला सुरुवात करत होते. मला वाटायचं हे मला जमणार नाही.’

श्वेतानं सांगितलं की, ‘जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा मी माझ्या मुलीला याबाबत बोलले. ती मला म्हणाली तू आता अ‍ॅक्टींगला वैतागाली आहे. जर तुला आता अ‍ॅक्टींग सोडायची असेल तर 90 च्या दशकातील अभिनेत्री बनून सोडण्यात अर्थ नाही. आजची अभिनेत्री बनून सोड. तिनंच मला यासाठी तयार केलं की, ऑनस्क्रीन कोणाला किस करण्यात काहीच वाईट नाही.

जेव्हा मी सेटवर आले आणि सिनेमॅटोग्राफी पाहिली तेव्हा मी विचार केला हे काय आहे. जेव्हा कधी मी सेटवरून जायची तेव्हा रडायची. पुन्हा सेटवर येतानाही मला रडू येत होतं. अक्षय यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी माझी खूप मदत केली. हे सीन्स एवढे चागंले झाले या माझ्या मुलीचाही मोठा वाटा आहे.’

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=lni2GXo3LDs

Leave a Reply

%d bloggers like this: