Take a fresh look at your lifestyle.

सिद्धार्थ, अमेयच्या अंगात शिरला DJ ब्राव्हो; केला भन्नाट डान्स !

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचा खेळाडू डीजे ब्राव्हो याने नुकताच ‘द छमिया सॉंग’ नावाचे सिंगल ट्रॅक डान्सर शक्ति मोहन सोबत रिलीज केले आहे. याच नव्या गाण्याचा अभिनेता अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव डान्स करताना पाहायला मिळत आहे. या दोघांना भन्नाट डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

मल्टिस्टारर मराठी चित्रपट ‘धुरळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

३० सेकंदाचा हा व्हिडीओ असून, यात दोघांनी डान्सची मजा घेतलेली दिसत आहे. धुरळाच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. अमेय आणि सिद्धार्थ एका गाण्यावर डान्स करताना चित्रपटाचा लेखक क्षितीज पटवर्धनने हा व्हिडीओ शूट केला आहे. ‘जेव्हा धुरळाच्या शूटिंगदरम्यान माझ्या आणि सिद्धार्थच्या अंगात ब्राव्हो आणि पोलार्ड संचारले’, असं कॅप्शन अमेयने या व्हिडीओला दिलं आहे. या कॅप्शनप्रमाणेच हे दोघं क्रिकेटर ब्राव्हो आणि पोलार्डसारखे नाचताना पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: