Take a fresh look at your lifestyle.

गायक सोनू निगमसह त्याची पत्नी आणि मुलास कोरोनाची बाधा; इंस्टावर शेअर केला व्हिडीओ संदेश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. अलीकडेच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आल्याचे समजल्यानंतर जगभरातील चिंता आधीच वाढली होती. यांनतर हा विषाणू सौम्य असल्याचे समजले मात्र याचा प्रसार अत्यंत वेगाने होतोय. याचा प्रत्यय सध्या येत आहे. सर्व सामान्यांपासून अगदी राजकीय नेते, क्रीडा संबंधित आणि मनोरंजन क्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. यानंतर आता गायक सोनू निगमसह त्याची पत्नी मधुरिमा आणि मुलगा निवान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती देताना त्याने इंस्टाग्रामवर एक संदेश व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनू निगमने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. यात त्याने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यात त्याने सांगितले कि, सध्या तो दुबईत आहे. मात्र कामासाठी भारतात येण्याआधी त्याने चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या व्हिडिओत तो म्हणतोय, “मी सध्या दुबईत आहे. मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर सीझन ३चे शूटिंग करण्यासाठी भारतात यायचे आहे. यासाठी मी स्वतःची चाचणी केली आणि मला कळलं मी पॉझिटिव्ह आहे. माझी पुन्हा चाचणी झाली आणि मी पुन्हा पॉझिटिव्ह आलो. मी पुन्हा पुन्हा चाचणी करून घेतली पण माझे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

पुढे, यानंतर मलाही असेच वाटते की, आपल्याला त्याच्याबरोबर जगावे लागेल. व्हायरल ताप, घसा खराब किंवा रक्तसंचय असताना मी अनेक वेळा मैफिलीत सादरीकरण केले आहे. “माझ्यामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांबद्दल मला वाईट वाटत आहे. आमच्या शेजारी बरेच लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत. हे खूप वेगाने पसरत आहे. मला खूप वाईट वाटत आहे, कारण आत्ता कुठे आम्ही कामाला सुरुवात केली होती. पण आशा आहे की, सर्व काही ठीक होईल.” पुढे, आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.