Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! सोनाली, पुष्कर आणि आशयचा ‘व्हिक्टोरिया’ लूक चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षक जिला अप्सरा म्हणून ओळखतात ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते हे काही वेगळे सांगायला नको. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. विविध फोटो, दिलखेचक अदा, गोड हास्य आणि अव्वल अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अलीकडेच तिचा झिम्मा आणि पांडू असे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करताना दिसत आहेत. यानंतर आता एका वेगळ्या कथानकासोबत सोनाली काही रहस्यांचा उलघडा करणार आहे असे दिसतंय. तिच्या आगामी प्रोजेक्टमधील तिचा आणि तिच्या सहकलाकारांचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत निभावल्या प्रत्येक भूमिकेत ती स्वप्नसुंदरी भासत होती. याशिवाय आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग तर चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जातात. पण यावेळी जर या तिघांचे आगामी चित्रपटातील लूक पाहाल तर सर्वात आधी त्यांचा हा अवतार तुम्हाला पाहवणार नाही. नंतर काळजी वाटेल आणि कदाचित भीतीसुद्धा. कारण सोशल मीडियावरील व्हायरल झालेले हे फोटो अत्यंत वेगळे आणि भयावह आहेत. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झालेल्या पाहायला मिळत आहेत. पण प्रत्येक कलाकारासाठी हटके आणि वेगळी भूमिका करायची असेल तर काही नेहमीपेक्षा वेगळं करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता सोनाली, पुष्कर आणि आशय वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या कथानकासह लवकरच मनोरंजन करण्यास सज्ज आहे. त्यांचा हा लूक आगामी चित्रपट ‘व्हिक्टोरीया’मधील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी आगामी चित्रपट व्हिक्टोरियाचे पोस्टर शेअर केले होते.. सोनालीने हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले कि, प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! याशिवाय पुष्करनेदेखील आपला लूक शेअर करताना चाहत्यांना कमेंट करून आपण कसे वाटत अशोक असे विचारले आहे. तर आशयनेदेखील सोशल मीडियावर आपला फर्स्ट लूक शेअर केला असल्याचे दिसत आहे. तिघांच्या होतोंवर अनेक चाहत्यांच्या आणि अनेक कलाकारांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या गूजबम्प्स एंटरटेनमेंटने संयुक्तपणे निर्मित केलेला हा तिसरा मराठी चित्रपट आहे. याशिवाय जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनीच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याशिवाय आता सोनालीच्या लुकनंतर पुष्करचा लुकदेखील सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसतो आहे. कलाकारांचे लूक पाहता चित्रपटाचे कथानक भयपटाकडे बोट दर्शवित आहे असे म्हणता येईल. आतापर्यंत रिलीज लूक नंतर चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. तूर्तास इतकीच माहिती मिळत असली तरीही लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली जाईल असा अंदाज आहे.