Take a fresh look at your lifestyle.

काय घाणेरडेपणा आहे..मूर्ख बाई; कंगनाच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड जगतातील आघाडीची अभिनेत्री आणि पंगा गर्ल म्हणून ख्याती असलेली कंगना रनौत पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे . नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि इतरांहून वेगळं वागण्याच्या अट्टाहासापायी आधीच ट्रॉलर तिच्यावर तग धरून असतात. यानंतर आता सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भायानी यांनी शेअर केलेल्या एका व्हडिओमुळे कंगना पुन्हा एकदा चांगलीच ट्रोल होते आहे. नुसती ट्रोल नाही तर तिला लोकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याच झालं अस की, विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कंगना एका हॉटेलमध्ये दिसतेय. हा व्हिडीओच एका हॉटेलमधील आहे. जिथे कंगना पत्रकारांना पोज देताना दिसतेय. दरम्यान वेटरने हातात एक ट्रे पकडला आहे. ज्यात केकचे बरेच तुकडे आहेत. यातील एक तुकडा कंगना हातात घेते आणि तोंडाजवळ घेऊन जाते. फोटो क्लीक केल्यानंतर ती पुन्हा केक त्याच ट्रेमध्ये ठेवते. कंगनाचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे.

 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त करताना विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोरोना महासाथीदरम्यान असं करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने यावर दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, तिने केक उचलला आणि तोंडाजवळ घेऊन गेली, श्वास घेतला आणि तो केक ट्रेमध्ये ठेवला. काय मूर्ख बाई आहे ही! तर आणखी एक युजर म्हणाला, यालाच म्हणतात लोका शिकवे ब्रह्मज्ञान…