Take a fresh look at your lifestyle.

कायदा काही ठरवेल..,हि प्रसिध्दीची किंमत..;शाहरुखच्या लाडक्या लेकासाठी बॉलिवूडकरांचा पाठिंबा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खान याचा लाडका लेक आर्यन खानची कालची रात्र एनसीबीच्या कोठडीत गेली. कारण संपूर्ण रात्रभर आर्यनची कडक चौकशी झाली. दरम्यान आर्यन खान सतत फक्त आणि फक्त रडत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याला एनसीबीच्या कार्यालयातील लँडलाईनवरून वडिलांशी म्हणजेच शाहरूखसोबत २ मिनिटे बोलायची संधी मिळाली. यानंतरसुद्धा शाहरूख अजून काहीही बोललेला नाही. पण बॉलिवूडमधून मात्र विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

काल सुनील शेट्टीने त्या पोराला श्वास तरी घेऊ द्या म्हणत आर्यनची बाजू घेतली. तर रात्री उशीरा सलमान खान ‘मन्नत’वर शाहरूखच्या भेटीसाठी पोहोचला. यानंतर आता बॉलिवूड दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांनी शाहरुखला आणि आर्यनला धीर देत पाठिंबा दर्शविला आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट करत लिहिले, ‘आपलं मुल अडचणीतआहे, हे पाहणं कोणत्याही पालकांसाठी वेदनादायी असतं. कायदा काही ठरवेल, त्याआधीच लोक निकाल देऊन मोकळे होतात, तेव्हा तर ते अधिक वेदनादायी ठरतं. हा पालक शिवाय पालक व मुलांच्या नात्याचा अपमान आहे. हे गैर आहे. शाहरूख, मी तुझ्यासोबत आहे.

तर अभिनेत्री पूजा भट हिनेही शाहरूखला पाठींबा देत म्हटले कि, ‘मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे, असं नाही. पण तरी मी सोबत आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल. तर कभी हा कभी ना या चित्रपटात शाहरूखसोबत काम करणारी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिनेही त्याला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये सुचित्राने लिहिले कि, ‘मुलांना संकटात पाहण्यापेक्षा त्रासदायक पालकांसाठी काहीही नसतं. बॉलिवूडला लक्ष्य करणा-या एनसीबीने आत्तापर्यंत फिल्म स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहेत ना? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाशा आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे.

या शिवाय अभिनेत्री नफीसा अली सोढी यांनीदेखील शाहरुख आणि आर्यनसाठी पाठिंबा दर्शविला आहे. ‘आर्यनसाठी मी प्रार्थना करते. त्याला मदतीची गरज आहे. त्याला उद्धवस्त करू नका,’अशी पोस्ट नफीसा यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.