Take a fresh look at your lifestyle.

लोकप्रिय सासू सुनेचा डान्स व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल; पाहाल तर तुम्हीही म्हणाल.. अग्गंबाई

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अग्गंबाई सासूबाई या लोकप्रिय मालिकेचे नुकतेच दुसरे पर्व सुरु झाले आहे. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्यास आता अग्गंबाई सुनबाई या प्रवाशी प्रेक्षकांची चांगली साथ लाभतांना दिसतेय. या मालिकेचे कथानक आधीच्या परवासावर अगदी विरुद्ध टोकाचे असल्याचे दिसत आहे. आधीच्या पर्वातील सारी पत्रे प्रेक्षकांना भावली होती. याही पर्वातील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. दरम्यान या मालिकेत भूमिका साकारणारे इतर कलाकार तेच असून सोहम आणि शुभ्रा हि जोडी मात्र बदलण्यात आली आहे. नुकताच या मालिकेतील सासू सुनेच्या जोडीचा डान्स करतानाच व्हिडीओ काही तासांतच प्रचंड वायरल झाला आहे.

या मालिकेतील आसावरी आणि शुभ्राला चाहत्यांची विशेष पसंती मिळत आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर आसावरी आणि शुभ्राचा एक डान्सिंग रील व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत त्या दोघी डान्स करताना दिसत आहेत. अग्गंबाई सूनबाई मालिकेत शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री उमा हृषिकेश हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आसावरी आणि शुभ्रा डोन्ट रश या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या सासू सूनेचा रील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

अग्गंबाई सूनबाई या मालिकेने नुकतेच रंजक वळण घेण्यास सुरुवात केली आहे. शुभ्रा आणि सोहमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आसावरी त्यांना सरप्राईज देते. पण त्यात सुझेन शुभ्राला धक्कादायक सरप्राइज देण्याचा प्लॅन करते. त्यानुसार ती शुभ्रा रुमवर आहे हे सोहमला सांगत नाही. त्यामुळे सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण लवकरच शुभ्रा समोर येणार आहे. त्यानंतर शुभ्रा हा धक्का पचवू शकेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्यात आसावरी आणि अभिजित लेकीसमान सुनेच्या बाजूने उभे राहणार हे नक्की. हि मालिका आणखी कोणकोणती वळणे घेणार हे पाहणे दिवसेंदिवस रंजक होऊ लागले आहे.