Take a fresh look at your lifestyle.

‘फ्रेंड्स : द रियुनियन’चा भारतातील नवा विक्रम; ९ तासांत मिळवले ‘१० लाख’ व्ह्यूज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फ्रेंड्स : द रियुनियन’ ९०च्या दशकातील प्रेक्षकांचा अत्याधिक लोकप्रिय असा ‘फ्रेंड्स’चा शो आहे. ज्याचा शेवटचा सीझन गेल्या गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते आधीपासूनच खूप उत्सुक होते. हा शो भारतातही परदेशाइतकाच अत्यंत लोकप्रिय असून सर्व स्तरांवर पसंत केला जात आहे. या शोचा शेवटचा सिझन काल अर्थात २७ मी २०२१ रोजी झी५ वर रिलीज झाला आहे. यानंतर काही तासांतच त्याने भारतात एक नवा विक्रम स्थापित केला आहे. अगदी ९ तासांत या सिजनला १० लाख आणि आता त्याहूनही अधिक व्युज मिळाले आहेत.

फ्रेंड्स रियुनियन एक असा शो आहे, जो मैत्री आणि मैत्रीतल्या भावनांशी संबंधित आहे. हा शो पाहण्यासाठी त्याचे प्रेक्षक खूप उत्साही होते. त्यानंतर झी 5 वर याचा प्रीमियर होताच, लोकांनी तो पाहण्यास सुरुवात केली. सोबतच सोशल मीडियावर या शोविषयी भावनिक पोस्टही शेअर केल्या. झी५ च्या डिजिटल बिझनेस प्रमुखांनी याविषयी माहिती देत म्हटले की, आतापर्यंत १ दशलक्षाहून अधिक लोकांनी हा शो पाहिला आहे.

तर झी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका म्हणाले, ‘फ्रेंड्स द रियुनियनला झी ५ वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात १० लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहे आणि अद्याप मोजणी सुरु आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.’

‘फ्रेंड्स द रियुनियन’ हा १०४ मिनिटांचा असून यात जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यासह, जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई हे दिग्गज पाहुण्यांच्या भूमिकेत दिसत आहेत.

‘फ्रेंड्स द रियुनियन’चा प्रीमियर होताच सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि इमोशनल पोस्टची एक लाट उसळली आहे. या शोचे चाहते पात्रांसह आपल्या मित्रांनाही या पोस्ट टॅग करून त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.