Take a fresh look at your lifestyle.

‘या’ अभिनेत्रीने तर रणवीरलाही मागे टाकलं; बर्थडे’ला शेअर केला न्यूड फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये बोल्ड आणि ब्युटीची काहीच कमी नाही हे आपण सारेच जाणतो. त्यात हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर असे काही सक्रिय असतात कि बस्स्स.. यामुळे चाहतेही त्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका बोल्ड अभिनेत्याचा कहर सगळ्यांनीच अनुभवला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून रणवीर सिंग आहे. त्याच न्यूड फोटोशूट सोशल मीडियासाठी एक धक्का ठरला. पण रणवीरच्या फोटोशूटपेक्षाही खतरनाक फोटो एका अभिनेत्रीने शेअर केला आहे. तो पाहून तुम्ही म्हणाल रणवीर तर काहीच नाही राव..

रणवीरने एका मॅगझीनसाठी हे न्यूड फोटोशूट केलं होत. हे फोटोशूट इंटरनॅशनल लेव्हलचं होतं. त्याने अंगावर एकही कपडा न घालता केलेलं हे फोटोशूट पाहून जो तो त्याच धाडसाचं कौतुक करतोय आणि दुसरीकडे ट्रोल करण्याची संधीही सोडू इच्छित नाही. पण या अभिनेत्रीचा हा फोटो तर रणवीरला बोल्डनेसमध्येही जोरदार टक्कर देणारा आहे असे म्हणता येईल. हा फोटो आहे हॉलिवूड अभिनेता ब्रूस विलर्स आणि अभिनेत्री डेनिमर यांची मुलगी स्काऊट विल्सचा. तिने नुकताच स्वतःचा ३१ वा वाढदिवस साजरा केलाय. या खास दिवशी तिने स्वतःचा हा न्यूड फोटो शेअर केला आहे. न्यूड फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शनही दिलं आहे.

तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय कि, ‘येणार वर्ष हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असणार आहे.’ या फोटोमध्ये स्काऊट निसर्गाच्या सानिध्यात आपला वाढदिवस साजरा करते आहे असे दिसत आहे. यात स्काऊट एका बाथ टबमध्ये दिसतेय. यात तिने आपला फोटो क्लिक करताना पाठ दाखवून चेहरा लपवला आहे. सोशल मीडियावर हा फोटो भारीच कहर करताना दिसतोय. अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं पण आता तिच्या पाठोपाठ या अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर तुम्ही काय विचार कराल…? किंवा काय म्हणाल हे महत्वाचं आहे. तूर्तास तरी हे दोन्ही फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून येत आहे.