Take a fresh look at your lifestyle.

‘बचपन का प्यार’… आणि काय हवं ? ट्रेंडिंग गाण्यावर उमेश – प्रियाचा कमाल डान्स वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची गोड जोडी. या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम असून ते प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटो आणि खास क्षण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात. तर यावेळी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे या ट्रेंडिंग गाण्यावर उमेश प्रियाने हटके आणि जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओत उमेशने ब्लेझर तर प्रियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे दोघेही या व्हिडिओत एकदम एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

बचपन का प्यार आणि काय हवं ? असं कॅप्शन देत उमेश कमतने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा धुवाँधार पाऊस पडतोय. तर चित्रपटसृष्टीतील अनेक मराठमोळ्या कलाकारांनीही या व्हिडिओला पसंती दिली आहे. नुसती पसंती नव्हे तर कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडिओवर, अरे बापरे ..मला विश्वास बसत नाहिय तुम्ही लोकांनी हे केलं…, असं म्हणत अमृता खानविलकरने काही स्माईली इमोजी कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत.

मराठी इंडस्ट्रीमध्ये हे कपल एक गोड आणि क्युट कपल म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत लोकप्रिय आहे. जवळ जवळ ६ वर्षे एकमेकांसोबत डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांची मैत्री व प्रेम तितकेच तरुण आणि फ्रेश आहे. इंडस्ट्रीत एकत्र काम करताना मैत्री आणि मग कालांतराने मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असता आता व्यक्त होण्यासाठी पुढाकार घ्यायची वेळ आली होती. मग प्रेम व्यक्त करण्यासाठी अखेर प्रियाने पुढाकार घेतला आणि मग हे दोघे कायमचे एकरूप झाले. प्रिया उमेशच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर सध्या हे दोघेही एकत्र लवकरच ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत. शिवाय प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स २ हि वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवीत आहे. तर उमेश अभिनेत्री मुक्त बर्वेसोबत ‘अजुनही बरसात आहे’ या मराठी मालिकेत दिसत आहे.