Take a fresh look at your lifestyle.

उर्फीचा ओशन लूक व्हायरल; शिंपल्याची बिकिनी घालून चाहत्यांची वाढवली धडधड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिची युनिक स्टाईल आणि बोल्ड ड्रेसेसची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. तिचा लूक हा कोणत्याही बोल्ड अभिनेत्रीला लाजवेल असाच असतो. अनेकदा तिच्या अशा लूकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण ट्रोलिंगला घाबरून गप्प बसणाऱ्यांपैकी उर्फी जावेद नाही. त्यामुळे ती नेहमीच आपले हटके फोटोज आणि व्हिडीओज बिंदास शेअर करत असते. आता तर मॅडमने चक्क शिंपल्याची बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना काय बोलू तेच सुचेनासे झाले आहे.

सध्या उर्फीचा सागर किनारी एक आगळा वेगळा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिचा हा खास व्हिडिओ तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा लूक अतिशय वेगळा आहे. कारण यामध्ये तिने परिधान केलेली बिकिनी काही साधी सुधी नाही तर चक्क शिंपल्यांची बिकिनी आहे. तिची शिंपल्यांची बिकिनी पाहून चाहत्यांनी तर कौतुक केलं पण इतर नेटकरी तिला ट्रोल करण्यासाठी संधी कशी काय सोडतील. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लूकवर टीका केल्या आहेत.

वास्तविक उर्फीच्या फोटोंची दखल घेणं नेटकऱ्यांना नेहमीच आवडतं. कारण तिचे फोटो आणि व्हिडीओ आवडत नाहीत तर पहायचेच कशाला नाही का..? पण उर्फीची एकही पोस्ट वाया जात नाही. तर तिच्या प्रत्येक फोटोंना आणि व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरपूर व्ह्यूज आणि कमेंट्स मिळतात. त्यामुळे उर्फी जावेद सोशल मीडियाचा जणू जीव झाली आहे. उर्फीनं सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट लूक फक्त शेअर करायची कमी कि ती व्हायरल झाली म्हणून समजाच. उर्फीला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अलीकडेच तिचे ३ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत आणि यासाठी तिने गोव्यामध्ये खास पार्टीचे आयोजन केले होते.