Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठी 3’चा विजेता विशाल निकम नक्की आहे तरी कोण?; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर… तो क्षण आला आणि बिग बॉस मराठी ३ चा महाविजेता कोण हे सर्वांनाच कळून चुकलं. ज्याच्या मुखी माउलीचे नाम आणि ज्याच्या डोक्यावर ज्योतिबाचा हात असा सांगलीचा रांगडा गाडी विशाल निकम याने सर्वांना मागे टाकून बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी आणि २५ लाख रुपयांचा धनादेश मिळवून विजेतेपद मिळवले. बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन सुरु झाल्यापासून विशाल निकमने आपला खेळ मनापासून हार जीतचा विचार न करता खेळला आहे. त्यामुळे दिलवाला विशाल प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक झाला. त्याने घरात अनेक नाती जोडली आणि ती टिकवलीसुद्धा. यानंतर २६ डिसेंबरच्या रात्री बिग बॉस मराठीचे विजेतेपद त्याच्या नावी झाले. मात्र अनेकांना प्रश्न पडलाय कि विशाल निकम आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊया विशाल निकमविषयी काही खास गोष्टी.

बिग बॉस मराठी सीजन ३ चा विजेता विशाल निकम याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. विशाल लहानपणापासूनच अभिनयाशी जोडला गेला. इतकेच नव्हे तर त्याला अभिनयासोबत फिटनेसचादेखील भलताच छंद होता. त्यामुळे शालेय जीवनापासूनच त्याची ओढ मनोरंजन क्षेत्राकडे राहिली.

यानंतर त्याने आपला मार्ग निश्चित केला आणि थेट मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. मॉडेलिंगमध्ये चांगला जम बस्तान त्याने आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात करण्याचे योजिले आणि फिटनेससोबत लुककडे आणखी लक्ष देऊ लागला.

यानंतर विशालने मिथुन या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. हा मराठी चित्रपट २०१८ सालामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये विशालने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडे दिसली होती. त्यानंतर विशालनं धुमस या मराठी चित्रपटातही काम केलं होतं. मात्र विशालला खरी लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमधून. या मालिकांनी त्याची ओळख निर्माण केली आणि विशाल निकमची बिग बॉस मराठी ३च्या घरात एंट्री झाली. यानंतर बिग बॉसच्या निकालानंतर त्याचा वाढलेला चाहतावर्ग किती असेल याचा अंदाज येतोच.