Take a fresh look at your lifestyle.

तुलना कश्यासाठी? नव्या वायरल व्हिडीओमुळे सहदेव झाला ट्रोल; विशाल ददलानीने ट्रोलर्सला घेतले फैलावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय, ट्रेंडिंग आणि वायरल व्हिडीओजपैकी लक्षात राहिलेला व्हिडीओ म्हणजे ‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या त्या मुलाचा व्हिडीओ. अर्थात त्या मुलाचा म्हणजे सहदेव दिर्दो नावाच्या १० वर्षीय चिमुकल्याने सोशल मीडियाचा ट्रेंडिंग पोल पूर्ण दणाणून टाकला.

अहो इतकेच काय तर चक्क बॉलिवूड रॅपर बादशाहने तर त्याच्यासोबत गाणं तयार केले आणि हे गाणेदेखील तुफान व्हायरल झाले. त्यामुळे सहदेव बन गया सुपरस्टार.

एकीकडे अनेको कलाकारांना त्याच्या गाण्याची भूल चढली तर दुसरीकडे आणखी एका लहान मुलाचा व्हिडीओ वायरल झाला होता. यानंतर दोन्ही मुलांमध्ये इतकी तुलना करण्यात आली कि सहदेव चक्क ट्रोल होऊ लागला. त्यामुळे या ट्रोलिंगला रोख लावण्यासाठी संगीतकार विशाल ददलानी यांनी एक व्हिडीओ शेअर करीत ट्रोलर्सची खरडपट्टी काढली आहे.

कुणाला सहदेवच गाणं आवडलं तर कुणाला नाही. दरम्यान वायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओतील मुलगा देशभक्तीपर गीत गाताना दिसत आहे. तो मुलगा माई वापस आऊंगा हे गाणे गातोय. यात काहीच वाद नाही कि तो अतिशय सुरेल गट आहे. पण म्हणून सहदेवळा ट्रोल करणे कितपत योग्य आहे? असा सवाल विशाल ददलानी यांनी उपस्थित केला आहे. देशात सहदेवपेक्षाही प्रतिभावान मुलं आहेत. सहदेवमध्ये काहीही खास नाही. त्याला डोक्यावर घेण्याची इतकी गरज नाही, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया ट्रोलर्सने दिल्यानंतर या ट्रोलर्सवर विशाल ददलानी चांगलेच भडकले आणि सहदेवची अन्य मुलांसोबत तुलना करणा-यांना त्यांनी फैलावर घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

विशाल ददलानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत म्हटले आहे कि, ‘मी गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ पाहतोय. हा मुलगा लोकप्रिय व्हायला हवा होता. ‘बचपन का प्यार’ गाणारा मुलगा मुलाला एवढी प्रसिद्धी का? असे लोक म्हणत आहेत. ही तुलना आवश्यक आहे का? कदाचित एखादा मुलगा खूप चांगले गाऊ शकतो आणि दुसरा त्यापेक्षा थोडा कमी. एका मुलाचे गाणे लोकप्रिय झाले असेल. तर याचा अर्थ असा होत नाही की दुसरा मुलगा त्याच्यापेक्षा कमी आहे. काही मुलं चांगली गातात, काही त्यापेक्षा कमी चांगली. अशात मुलांची तुलना करणे ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. दोन्ही मुलं चांगली शकत नाहीत का? दोघेही त्यांच्यापरिनं लोकांचं मनोरंजन करतात. ही लहान मुलं आहेत. त्यांचा असा अपमान करून तुम्हाला काय मिळणार आहे? यातून तुम्हाला काय मिळणार आहे? कृपया असं वागू नका.’

Leave A Reply

Your email address will not be published.