Take a fresh look at your lifestyle.

‘किरण माने अतिशय चांगले व्यक्तिमत्व’; सोशल मीडियावर महिला कलाकारांच्या व्हिडीओ पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारत होते. या भूमिकेला लोकांनी प्रचंड प्रेम दिले आणि देत होते. मात्र तरीही चॅनेलने तडकाफडकी किरण मानेंना मालिकेतून काढून टाकले आणि नव्या वादाला तोंड फुटले. यानंतर आपल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप मानेंनी केला होता. त्यावर मालिकेतील काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांचे आमच्यासोबत वर्तन चांगले नव्हते. तर अन्य काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांनी आमच्यासोबत कधीच गैरवर्तन केले नाही. याशिवाय वेगळे मत ठेवणाऱ्या महिला कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मानेंच्या समर्थनार्थ मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळतो का काय असे वाटू लागले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत किरण माने यांच्यासह काही महिला कलाकार देखील काम करीत होत्या. दरम्यान यांपैकी तीन महिला कलाकारांनी मानेंच्या विरुद्ध प्रतिक्रिया देत चॅनेलच्या बाजून आपले मत माध्यमांसमोर मांडले. यामध्ये अभिनेत्री सविता मालपेकर, श्रावणी पिल्लई आणि दिव्या पुगावकर यांचा समावेश आहे. तर याच सेटवरील अन्य महिला कलाकारांनी मात्र मानेंवरील सर्व आरोप धुडकावून आपले समर्थन दिले आहे. यामध्ये श्वेता आंबीकर, प्राजक्ता केळकर या महिला कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर मानेंच्या समर्थनार्थ व्हिडीओ पोस्ट केल्या आहेत. सध्या या सर्व व्हिडीओ चांगल्याच चर्चेत आहेत.

दरम्यान माध्यमांशी बोलताना सविता मालपेकर यांनी सांगितले कि, राजकीय पोस्टमुळे किरण माने यांना काढण्यात आले नाही तर त्यांच्या वागणुकीमुळे काढण्यात आले आहे. त्याला तडफडाकी काढण्यात आले नाही, त्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी शेवटची मिटींग घेवून त्याला फायनली सांगण्यात आले होते की सेटवरून तुझ्याबाबत तक्रार आली तर मालिकेतून काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तर श्रावणी पिल्लई यांनी सांगितले होते कि, आम्ही कामापुरत केवळ बोलतो. आमचा कलाकारांचे नाव घेतले नाही कारण आम्ही तोंड उघडले तर खरे काय ते बाहेर येईल, त्यामुळे कलाकारांवर आरोप केले नसतील. राजकीय पोस्टमुळे चॅनेलने कधीच आक्षेप घेतला नाही. याशिवाय दिव्या पुगावकर म्हणाल्या कि, ते आमच्याशी चांगले वागत नव्हते. आम्हाला शिवीगाळ करायचे.

यानंतर मुलगी झाली हो याच मालिकेत आर्या हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री श्वेता आंबीकर म्हणाल्या कि, किरण माने माणूस म्हणून खूप चांगले आहेत. आमचं सेटवर खूप चांगलं कॉर्डीनेशन असत. त्यांनी आमच्यासमोर कधीच कोणतेही अपशब्द काढले नाहीत. शिवीगाळ केली नाही. त्यांची आमच्यासोबत नेहमी उत्तम वागणूक राहिली आहे. तर आत्याबाई पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता केळकर यांनीही किरण माने चांगले असल्याचे सांगितले आहे. याशिवाय अन्य अनेक अभिनेत्रींनी मानेंना समर्थन दिले आहे.